Labad manase kon?

लबाड माणसे कोण? who are fraud peoples?

🔹ज्यांनी गाय पवित्र आहे असे सांगितले त्यांनी कधीही गाय सांभाळली नाही, पण दूध, तुपाशिवाय जेवले नाहीत!
🔹ज्यांनी सर्वांना सत्यनारायण करायला सांगितला त्यांनी कधीही सत्य नारायण घातला नाही. पण दुसऱ्याच्या घरचे सत्यनारायनाचे सामान मात्र लंपास करून स्वतःच्या घरी नेले!
🔹ज्यांनी अन्नदान महादान सांगितले त्यांनी कधिही अन्नदान केले नाही, उलट भिक्षा हा शब्द बदलून दक्षिणा व माधुकरी हा शब्द आणला.
🔹ज्यांनी नारायण नागबळी व शांती सांगितली त्यांनी कधिही नारायण नागबळी व शांती केली नाही उलट नेहमीच इतर लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवून सुशिक्षित होऊ दिले नाही!
🔹ज्यांनी चारोधाम सांगितले त्यांनी कधीही चारोधाम केले नाही पण ज्या मंदिरावर ताबा मिळवला ते कधीच सोडले नाही आणि लोकांना चारधाम यात्रा करन्याचा सल्ला दिला!
🔹ज्यांनी महिला शिक्षणाला विरोध केला
त्यांच्याच महिला सर्वात जास्त शिकल्या !
🔹ज्यांनी परदेशगमनाला विरोध केला ते सर्वात जास्त शिकून परदेशात स्थायिक झाले म्हणजेच (NRI) झाले आहेत!
🔹मातृ पितृ देवो भव म्हणणारांचे मातापिता अनाथ आश्रमात आणि हे मोठमोठया शहरात व परदेशात आहेत!
🔹एकादशीत अन्न खावू नका म्हणणारे किड्यांद्वारे प्रक्रिया केलेला साबुदाणा चिवडा आनंदाने खातात!
🔹कधीही मंदिर न बांधणारे, मंदिरासाठी वर्गणी न देणारे मात्र पूजेच्या नावाखाली कायम मंदिरात असतात!
🔹इतरांना पारायण करायला सांगणारे
कधीही पारायण ऐकतही नाहीत स्वतः करीत ही नाहीत!
🔹कधीही रामराम न म्हणणारे जय परशुराम म्हणतात, आणि रामाला न  माननारे रामाचे मंदिरासाठी वाद घालतात.
🔹 राजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकास विरोध करणारे मात्र हिंदू राष्ट्राची मागणी  करतात  !ज्यांनी इंग्रजांची चाकरी करून, जनतेला शेकडो वर्षे  गुलाम केल..ते देशभक्ती नावाच्या मागे जातीचे, धार्मिकतेचे,विकासाचे राजकारण करतात
🔹संस्कृतीच्या गप्पा मारणारांच्या मुली मात्र नाटक, सिनेमात नट्या होऊन फिरतात
🔹कायम असत्य बोलनारे
सत्यमेव जयते म्हणतात.

समजून घ्या लोकांनो

Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 225K+ readers globally.