Marathi kavita baap 
 नवरा बायको ते आई आणि बाप..   मराठी कविता

 स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यन्त ती नवर्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी असो की ठसनी !

 जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते,
त्यांच्या भावना समजून घेते,
त्यांचे वाट्टेल ते लाड पुरविते,
जे पाहीजे ते मुलांना खायला देते,
नवर्याच्या चोरून मुलांना पैसे पुरविते ,
साहजिकच मुलं उत्पत्तीपासूनच आईच्या उदरांत, व जन्मापासून तिच्या सहवासात असतात.

बर्याच परीवारात मुलं तरुण झाले, की बापाशी बोलत नाहीत.
त्यांना जे मागायचं ते आईमार्फत वडिलांना निरोप पुरवितात, आईशी मनमोकळे पणाने बोलतात,
तीला न हिचकिचता मनातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी सांगून टाकतात.
काही माताच मुलांच्या या सर्व गोष्टी आपल्या पतींना सांगतात. पण जास्तीत जास्त महिला यापासून पतींना दूर ठेवतात.
मुलांच्या वाईट सवयी व झालेल्या छोट्या मोठ्या चूका लपवितात, त्यावर पडदा टाकतात आणि मुलं मग भरकटतात, बिघडतात.

आईचं मुलावर नितांत प्रेम असावं पण ते आंधळं प्रेम असू नये .
की ज्या प्रेमाने मुलांचं आयुष्य बर्बाद होतं.

मुलं विस वर्षाची झाली की, आईला फार मोठेपणा वाटतो मुलांचा! आणि ते साहजिक आहे पण या कौतुकासमवेत त्या आपल्या पतीकडे दुर्लक्ष करतात.
ते काही बोलले तर मधेच बोलून त्यांचे शब्द, त्यांचे बोलणे थांबवतात.
मग मुलावर बापाचा वचक राहत नाही .
मुलांना आई चांगली वाटते,
व बाप वैरी वाटायला लागतो.


वास्तविक कोणताच बाप मुलांचा वैरी नसतो .
मुलांना व्यवहार कळावा, ते धैर्यशाली,नीतीवान ,शीलवान ,बलवान बनावे .
चांगल्या लोकांमधे उठावे बसावे ,
सर्वाचा त्यांनी मानसन्मान करावा ,
अशा कितीतरी मानवी जिवन जगण्याच्या गोष्टी त्यांनी अचूकपणे कराव्या ,
यासाठी बाप मुलांना सतत रागावत असतो, टोकत असतो,
मुलांना शिस्त लागावी हा त्याचा प्रामाणिक  हेतू असतो,
मुलाच्या हातून काही चूकीचं घडू नये असं बापाला वाटते म्हणून तो आपल्या मुलांचे फालतू लाड करीत नाही.

marathi kavita for father 

पण याचा कुठेच सकारात्मक विचार होत नाही .
बापाचे गोडवे कुठेच गायले जात नाहीत
अशा परीस्थीतीत माणूस खिन्न होतो ,
त्याच्या मनातील भावना पत्नी समजून घेत नाही .
ती असं कधीच म्हणणार नाही की, "बाऴा,तुझे वडिल तुला तुझ्या भल्यासाठीच बोलतात, रागावतात.ते तुझ्या अभ्यासासाठीच तुला बोलतात, तुझ्या भल्यासाठीच सगळं  करतात.
ते तुला बोलतात पण त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही असं तर होत नाही ना ?"
उलट ,अनेक आई म्हणतात (मुलांच्या समोरच )
" बस करा, तुम्हाला माझी मुलंच दिसतात का नेहमी बोलायला , घरात आले की सुरु होता, तुम्हाला तर काहीच कळत नाही, मुलं मोठी झाली आता, त्याचे मित्र बनायला पाहीजे तुम्ही, पण नाही ...लेकरांत जिवच नाही ना तुमचा !
कधीतरी प्रेमानं बोललेत का तुम्ही त्याच्याशी ....
अशाप्रकारे ,आई नवर्याचा मुलांसमोर पाणउतारा करते .
आणि
मीच तुला समजून घेते,
मीच तुझ्यावर अलोट प्रेम करते, मीच सर्वकाही करते, असा मात्रुत्वाच्या प्रेमाचा व श्रेष्ठत्वाचा आव आणते.

साहजिकच सतत हँमरिंग होऊन मुलं बापापासून दूर जातात.

तीच मुलं लग्नानंतर पत्निप्रेमात तल्लीन झाल्यावर, आईला विचारतही नाहीत.

म्हणून वेळेचं भान ठेवा.

मुलांना सुसंस्कार देणे हे आईचेच काम आहे पण त्यांना घडवतांना बापाचाही सहभाग आणि धाक असायलाच हवा.

कायम लक्षात ठेवा...
लहानपणी बापाचा हात धरला,

तर मोठेपणी कोणाचेही पाय धरायची वेळ येत नाही

बाप हाच बापमाणुस असतो..
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼


poem on father in marathi
marathi kavita on father and daughter
मराठी कविता
bap kavita
baap kavita
poem on dad in marathi
baap poem in marathi
birthday wishes for father in marathi

Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.

0 comments: