Marathi charolya sms

We have many marathi charolya sms for couples, nowadays youngster like to update marathi love status. Check best marathi love status for whatsapp or facebook. See you again

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही


कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही


तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा
तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा


मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते


तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी



चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना…………….


आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना………………..


अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना……………….


झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना…………….


माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना…………..


विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना…………………


शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना……………


सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना


तुझ्या आठवणीत माझ्या
कित्येक रात्री जगात गेल्या
आणि त्या सुधा मला माझं
प्रेम मागत गेल्या .


तू माझा आहेस
अस म्हणताना
मनात काहीस होत
तुला मी माझं म्हटल्याच
मनही ग्वाही देत .


शोधल होत तू मला ,
य माणसांच्या गर्दीतून
आपल समजून .
तूच हरविलास या गर्दीत
आज मला विसरून .

marathi charolya prem
charoli in marathi on friendship
marathi charolya on life
Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.