Good thought in marathi on life - family status in marathi

good thought in marathi on life for family. we have collected family status in marathi, you can call it marathi msg for life.

We also covered good morning sms in marathi

वाचा..नाती काय असतात..

*।।आई- वडील।।*
सार्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातं 
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं, आपल्या घराची जीवित दैवत, तीर्थाचे सागर , स्नेहाचे आगर 
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती, आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर.

*।।काका - काकी।।*
आई वडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या सागर - सरिता 
विशुध्द भावाचे चिंतामणी.*।।आजी - आजोबा।।*
आपले जीवन फुलविणारे माळी 
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ 
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश, स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती.

*।।बहिण।।*
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका, कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका.

good thought in marathi on life 

*।।भाऊ।।*
आपल्या हिमतीच्या धमन्या, आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं,
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं,
आपल्या आवाजातील निनाद.

*।।गुरुजन।।*
आपल्या भविष्याचे शिल्पकार 
आपल्या जीवनाचा प्रकाश 
अज्ञान दूर करणारे वासरमणी 
मानवतेचे महादूत.

*।।सासू - सासरे।।*
आपल्याला जन्म न देणारे आईवडील 
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप.

family status in marathi

*।।आत्या - मामा।।*
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती.

*।।मामा।।*
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं 
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो 
मा + मा = मामा, आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार.marathi msg for life

*।।मामी।।*
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती 
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती.

*।।दाजी।।*
आपल्या आदर भावाचं शिखर 
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक.


*।।साडु।।*
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं. इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ.

*।।मेहुणी।।*
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता, आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी.

*।।मावस भाऊ - बहीण।।*
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस, बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय.

*।।मेव्हणा भाऊ - बहीण।।*
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी, थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग.

*।।भाचे - भाची।।*
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे,
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं.

*।।पुत्र।।*
भविष्याचा प्रकाश, अस्तित्वाचा अर्थ,
वंशाचा कुलदीपक,कुटुंबाचा उध्दारक 
म्हातारपणीची काठी.family quotes in marathi*।।मुलगी।।*
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण,
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी,
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक,
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा, जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती.

*।।नातवंडे।।*
दुधावरली साय, आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा,
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट.

*।।मित्र मैत्री।।*
ईश्वरी वरदान, रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं, विश्वासाची आधारशीला, स्वतःचेच प्रतिरुप.

marathi quotes on life

*।।शेजार धर्म।।*
मानवी मूल्यांचा ओझोन, संस्कृतीचा संधीप्रकाश, आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन.

*।।शिष्य।।*
आपल्या कर्तृत्वाचा कळस व 
आपल्या कौशल्याची किरणं.


खरंच माणुस नाते जपतो का ?
जो जपतो नात तोच खरा माणुस . 
नातं जोपासणारा माणूस जणू पिसारा फुलवलेला मोरच ! नाही का ? 
नाते जपा.....नाते टिकवा........! माणुस म्हणुन जगा......
" हे जीवन पुन्हा नाही "..........!also check
Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 225K+ readers globally.

0 comments: